
चिपळूण येथे मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार
चिपळूण शहरातील हॉटेल अभिरुची जवळ मुंबई गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने राजेश सिताराम काटकर व बबन बाबू खरात राहणार चिपळूण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. दोघेजण रात्री मोटारसायकल घेऊन हॉटेल अभिरुची येथून सातरस्ता महामार्गावरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन हे वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने झालेल्या भीषण अपघातात हे दोघे जण जागीच ठार झाले.या अपघात ठार झालेले राजेश काटकर हे माजी नगरसेवक शिरीष काटकर यांचे बंधू आहेत.ज्या अज्ञात वाहनाने धडक दिली त्याचा आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
www.konkantoday.com