रत्नागिरी-हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी येथे एसटी चालकाला मारहाण.

रत्नागिरी-हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी येथे दुचाकीस्वाराने एसटी चालकाला मारहाण केली. तसेच दगड फेकून बसचे दोन्ही आरसे फोडले. ही घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. अजय भगवान पोटभरे (३२, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे एसटी चालकाचे नाव आहे. चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दुचाकीचालक श्‍वेतांग वायंगणकर (रा. रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.पोटभरे हे २९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी-नृसिंहवाडी एसटी (एमएच २० बीएल १२५४) घेवून जात होते. दुपारी ३ च्या सुमारास एसटी गयाळवाडी येथील रस्त्यावर आली असता श्‍वेतांग वायंगणकर याने एसटीपुढे दुचाकी आडवी आणली तसेच एसटी चालकाला बस थांबवण्याचा इशारा केला. त्यानुसार अजय पोटभरे यांनी रस्त्याकडेला बस उभी केली. यावेळी संशयित आरोपीने बसचालक पोटभरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच दगड फेकून एसटीचे आरसे फोडून नुकसान केले. अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button