रत्नागिरी जिल्ह्यात पिसाळलेल्य श्वानांनी १,४०९ जणांना घेतला चावा.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मोकाट जनावरांच्या पाठोपाठ भटक्या कुत्र्यांचाही त्रास वाढला आहे. या कुत्र्यांनी रस्त्यावर तसेच कॉलनी परिसरामध्ये धुमाकूळ घातला आहे. येथील काही कुत्री पिसाळलेली असून एप्रिल महिन्यापासून सहा महिन्यात १ हजार ४०९ जणांचा चावा घेतला आहे. या सर्वांना रेबीजची लस देण्यात आली आहे.www.konkantoday.com