
तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कमी केल्या
तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित करतात आणि सुधारीत दर जाहीर करतात. ताज्या मासिक सुधारणांनंतर देशभरातील व्यावसायिक ग्राहकांना या किमतीत कपातीचा दिलासा मिळाला आहे. नवीन किमती १ सप्टेंबरपासून लागू होतील.
ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याने हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. मनी कंट्रोनुसार, ५१.५० रुपयांची कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे.




