जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने आयोजित जिल्हा लोकअदालतीमध्ये ४ कोटींचे वाद संपुष्टात.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने आयोजित लोकअदालतीमध्ये ४ कोटी २२ लाख ८९ हजार ३२५ रुपयांचे वाद संपुष्टात आले तर ३ हजार ६३९ प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी रत्नागिरीतील थकीत व पक्षकार यांनी सहभाग घेतला होता. लोकअदालतीमुळे लोकांमधील वाद सामंजस्याने मिटविण्यात आल्याने बंधुभाव वाढण्यास मदत होईल, असे विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.www.konkantoday.com