
खेड येथील नवीन पोलीस कर्मचारी वसाहत काम भूमिपूजनाचा फुटणार नारळ.
जनतेच्या सुरशिक्षततेसाठी दिवस-रात्र झटणार्या येथील पोलीस कर्मचार्यांच्या वसाहतीची दैनावस्थाच झाली आहे. नवीन पोलीस कर्मचारी वसात उभारण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रयत्नाने सुसज्ज नवीन वसाहत उभारणीसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ४ किंवा ५ ऑक्टोबरला नवीन वसाहत कामाच्या भूमिपूजनाचा नारळ फुटणार आहे. येथील पोलीस यंत्रणेकडून भूमिपूजन सोहळ्याची तशी जय्यत तयारीही करण्यात येत आहे. यामुळे १८ महिन्यातच पोलीस कर्मचारी हक्काच्या घरात वास्तव्यास जाणार आहेत.www.konkantoday.com