
खेड तालुक्यातील कुळवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या मृत्यू.
मुखीखेड तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्या मानवी वस्तीत घुसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुळवंडी-शिंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात संकेत संजय शिंदे यांच्या मालकीच्या ४ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. जनावरांसह शेळ्या बिबट्यांकडून फस्त करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बिबट्याच्या अजूनही मानवी वस्तीत मुक्त वावर असल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीच वावरत आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com