लांजा शहरातील लिंगायतवाडी येथे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले विहिरी बाहेर.

भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना लांजा शहरातील लिंगायतवाडी येथे मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आली.लिंगायतवाडी येथील जितेंद्र रामचंद्र लिंगायत यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत हा बिबट्या पडला. मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला. मात्र यावेळी पाऊस असल्याने घरातील लोकांना काहीतरी पडले असेल असे वाटले. त्यानंतर जितेंद्र यांच्या पत्नी सीमा लिंगायत यांनी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी विहिरीतील पंप सुरू केला. त्यावेळी त्यांना पंपातून पाणी गढूळ येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सीमा या पूजेची फुले काढण्यासाठी विहिरीजवळ गेल्या असता त्यांना विहिरीवरील झाकण विस्कळीत झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांना दिसला. ही बाब वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्याला विहिरीबाहेर काढले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button