रत्नागिरी जिल्ह्यातील ९८ गावे वगळली जाण्याची शक्यता.
पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची (इको सेन्सेटिव्ह झोन) प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये समाविष्ट असलेल्यया गावांमध्ये जनक्षोभ वाढू लागला आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या अंमलबजावणीत सवलत मिळण्याच्या दृष्टीने इतर राज्यांनी केलेल्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत. अशातूनच जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमारेषेपासून १० कि.मी. च्या बाहेर असलेल्या गावांना यातून वगळण्याचा विचार सुरू झाला आहे. तसे झाले तर जिल्ह्यातील ३११ गावांमधील तब्बल ९८ गावांना या बाबत दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.www.konkantoday.com.