योगेश आर्या या तरूणाने घुमजाव केले मृतदेह स्वप्नात आला नसल्याची दिली कबुली.

स्वप्नात मृतदेह आल्याचा दावा करून मदतीसाठी याचना करत असल्याचे पोलिसांना सांगणार्‍या योगेश आर्या (३०, रा. आजगाव, सावंतवाडी, सिंधुदुर्ग) या तरूणाने घुमजाव केले आहे. तसे स्वप्न आपल्याला पडले नसल्याचा जबाब बदलत आपण स्वतः स्पॉटवर गेल्याची कबुली पोलिसांना दिल्याचे समजते. दरम्यान, भोस्ते घाटातील जंगलमय भागात आढळलेल्या सदर मृतदेहाबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची अजूनही शर्थ सुरू आहे. डीएनए चाचणी अहवालनंतर नेमक्या कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button