
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अमरावतीच्या अचलपूरमध्ये गुन्हा दाखल.
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अमरावतीच्या अचलपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी काल(रविवारी) हिंदू जण आक्रोश सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात धार्मिक भावना दुखवणे, कलम 196 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. इमरान खान असलंम खान यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात तक्रार देत आमदार नितेश राणे आणि सागर भैय्या बेग, कोपरगाव या दोघांवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहे.भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात द्वेष निर्माण व्हावा, अशी वादग्रस्त वक्तव्य केलीय. अश्या वक्तव्याने अचलपूर परतवाडा शहरातील शांती भंग करण्याचं काम नितेश राणेंनी केलंय. तसेच हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये वाद वाढावा, अशी वक्तव्ये त्यांनी केलीय. असं या तक्रारीत म्हटलं आहे