गोवा शिपाईड कंपनीची ५८ वी वार्षिक सभा वास्को गोवा येथे संपन्न. भागधारकांना १४०% लाभांश.
गोवा शिपयार्ड लि. ची ५८ वी वार्षिक सभा गोवा शिपयार्डच्या गोवास्थित कार्यालयात अध्यक्ष तथा मॅनेजिंग डायरेक्टर ब्रिजेशकुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बहुसंख्येने सभासदांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. सन २०२३-२४ चा अहवाल सभेने मंजूर केला. २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण ग्रॉस महसूल २०९० करोड प्राप्त केला असून महसुलातील वाढ गतवर्षीच्या तुलनेने १००% आहे. तर कंपनीने २०२३-२४ चा आर्थिक वर्षात करपूर्व नफा रु.३६४.६३ करोड इतका तर करानंतरचा नफा रु.२७१.३२ कोटी इतका प्राप्त केला. कंपनीच्या नफ्यात लक्षणीय ७६% वाढ झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये कंपनीचे व्हॅल्यू ऑफ प्रोडक्शन १४८७.४२ करोड झाले आहे. गतवर्षी हे मुल्य ५०९.३४ करोड होते. उत्पादनाच्या मुल्यातील ही वाढ कंपनीच्या प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी मधील गतिमानता दर्शवते. कंपनीने २०२३-२४ या वर्षा करता १४०% लाभांश आपल्या सभासदांना दिला आहे. वार्षिक सभेने लाभांशाला मंजुरी दिली. एकूण लाभांश हा ८१.४८ करोड रक्कमेचा होत आहे. कंपनीच्या वार्षिक सभेत वार्षिक अहवालाला मंजुरी देण्यात आली. ऑडिट रिपोर्ट स्विकारण्यात आला. लाभांशाला मंजुरी देण्यात आली. गोवा शिपयार्ड कंपनीत सध्या लहान मोठ्या २२ शिपची निर्मिती होत आहे. गोवा शिपयार्ड कंपनीचे उत्तम पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. त्याचे द्योतक म्हणजे सुरू असलेले २२ शिपची निर्मिती असं म्हटलंतर वावगं ठरणार नाही. १८५६२ कोटी खर्च करून या २२ शिपची निर्मिती होत आहे. त्यात दोन फ्रिगेट शिप ही रशियाच्या सहकार्यातून निर्माण होत असून त्यापैकी एकाचे जलावरण नुकतेच पार पडले. गोवा शिपयार्डची ऑर्डर बुक पोझिशन २० हजार कोटी पल्याड गेली आहे. स्वदेशी तंत्रज्ञान विकासावर गोवा शिपयार्ड प्रभावीपणे काम करत आहे. गोवा शिपयार्डच्या सभेला अध्यक्ष ब्रिजेशकुमार उपाध्याय, ॲड. दीपक पटवर्धन स्वतंत्र निर्देशक तथा ऑडिट समिती अध्यक्ष ,तसेच दुसरे स्वतंत्र निर्देशक हुकूमचंद हिंदोजा, कंपनी निर्देशक कॅ. जगमोहन तसेच दुसरे कंपनी निर्देशक सुनील बागी, कंपनी सेक्रेटरी छाया जैन उपस्थित होत्या.