कळंबुशी येथील दिलीप लक्ष्मण चव्हाण यांचे दोन तास ७ मिनिटे सुप्त वज्रासनाचे रेकॉर्ड.
संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथील दिलीप लक्ष्मण चव्हाण (झरेकर) यांनी भांडूप येथील सह्याद्री विद्यामंदीर येथे झालेल्या योग कार्यक्रमात २ तास ७ मिनिटे सुप्त वज्रासनात बसून जागतिक रेकॉर्ड करून आपले नाव कोरले आहे.याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. त्याचे प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांनी गावाचे, राज्याचे आणि देशाचे नाव रोशन केले असून गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.