आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीत प्रचंड पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीत प्रचंड पोलीस बंदोबस्तात काल सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.शिंदेंसेना व स्थानिक नागरिकांच्या विरोधकामुळे शांतीनगर स्मशानभूमी परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस बंदोबस्तापुढे तणावपूर्ण वातावरण निवळले होते.उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर स्मशानभूमी मध्ये सकाळी ११ वाजता दफन करण्यासाठी एक खड्डा काहीजण खोदत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. त्यांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती शिंदेंसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना दिल्यावर चौधरी यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी शांतीनगर स्मशानभूमीकडे धाव घेऊन खोदलेला खड्डा भुजविला. तसेच अंत्यसंस्कार करू देणार नाही. असा पवित्रा घेतल्याने, तणाव निर्माण झाला. बदलापूर येथील राहणारा अक्षय शिंदे यांचेउल्हासनगरात अंत्यसंस्कार का? असा प्रश्न चौधरी यांच्यासह नागरिकांनी पोलिसांना केला. अखेर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेऊन आंदोलन करणाऱ्या चौधरी यांच्यासह नागरिकांची पोलिसांनी समजूत काढली. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने, अखेर पोलिसांनी धडपकड करून अटक केली.स्मशानभूमी शिलबंद शिंदेसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, रवींद्र निकम, बाळा श्रीखंडे यांच्यासह असंख्य जणांची दुपारी ३ वाजता पोलिसांनी धडपकड करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणले. तर जमलेल्या स्थानिक नागरिकांना पोलिसांनी पिटाळून लावत स्मशानभूमीचे प्रवेशद्वार बंद केले. पोलिसांचा बंदोबस्त ठेवून स्मशानभूमीत जाण्यास प्रतिबंद केला.खोदलेला खड्डा बुजविला शिंदेंसेनेचे राजेंद्र चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक व महिलांनी अक्षय शिंदे यांच्या अंत्यसंस्काराला विरोध करीत अंत्यसंस्कार साठी खोदलेला खड्डा बुजविण्यात आला. यावेळी नागरिकांनी अंत्यसंस्काराला विरोध करीत घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडले.अंत्यसंस्कार ठिकाणी काही अप्रिय घटना होऊ नये म्हणून मोजक्या नातेवाईकांना सोडण्यात आले. मीडिया प्रतिनिधीला आत मध्ये एन्ट्री देण्यात आली नाही. त्यामुळे पत्रकारांनी पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली.