अतिवृष्टीत शाळांना सुट्ट्या मिळाल्या पण शिक्षण खाते बुडालेले
दिवस भरून काढणारपावसाळी हंगाम अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे कामाचे किमान दिवस होणे आवश्यक आहे. सुट्टीचे दिवस रविवारी किंवा अन्य दिवशी भरून घेण्यात येतील. शाळा स्तरावर हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कासार यांनी दिली.त म्हणाले, पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळांचे कामकाज होवू शकले नव्हते. सुट्टीचे दिवस भरून काढणे गरजेचे आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे कामाचे किमान दिवस झाले पाहिजेत. शाळास्तरावर रविवार किंवा अन्य दिवशी या सुट्ट्या भरून काढण्यात येतील. www.konkantoday.com