अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने झालेल्या स्पर्धेत कुडाळ महाविद्यालयाची ऑफलाईन प्रथम.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या सहयोगाने येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन गटातील महाराष्ट्रीय कलोपासक पुरूषोत्तम करंडक एकांकीका या अत्यंत मानाच्या मानल्या जाणार्या स्पर्धेमध्ये कुडाळ महाविद्यालयाच्या ऑफलाईन या एकांकीकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषित पटकावले.शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे दोन दिवस झालेल्या या स्पर्धेमध्ये एकूण ९ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक देवरूख येथील आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या हिरो नंबर वन सांघिक तृतीय क्रमांक रत्नागिरीच्या फिनोलेक्स कॉलेजच्या होलियो नगाराने पटकावला तर प्रायोगिक संघ म्हणून सिद्धयोग लॉ कॉलेज खेडच्या समाप्तची निवड करण्यात आली. www.konkantoday.com