
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधु दंडवते टर्मिनस नाव द्या, कोकण विकास समितीची मागणी
कोकणातील सावंतवाडी रेल्वेस्थानकाचे लोकनेते मधु दंडवते टर्मिनस असे नामकरण होण्यासाठी मंजुरी शिफारस पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे बोर्डाला पाठवावे, अशी मागणी कोकण विकास समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाा दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.अहमदनगरचे अजूनही संपूर्ण भारत देशात कोकणची ओळख निर्माण करून कोकणातील राजापूर मतदार संघातून सलग पाचवेळा खासदार म्हणून निवडून आलेले मधु दंडवते आदर्श ठरले होते. संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे करून राजापूर मतदार संघाची संपूर्ण देशभर विद्वान लोकांचा मतदार संघ, अशी ओळख निर्माण करून देण्यात त्यांचे मौलिक योगदान आहे. कोकण रेल्वेसाठी अनेक प्रश्न उपस्थित करत शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडल्यामुळेच कोकण खर्या अर्थाने रेल्वेमय झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.www.konkantoday.com