शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे प्रथम.
रत्नागिरी शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक (विभागून) प्रसन्न पानगले व प्रकाश घुडे आणि तृतीय क्रमांक आकाश शिंदे यांनी मिळवला. या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक समीर शिवलकर, सलोनी शेलार, सुरेंद्र घाणेकर, श्रीश डाफळे, मनोज सारंग, तसेच लहान मुलांनी स्वतः गणपती मूर्ती बनवलेल्या निहार डाफळे आणि प्रसाद फगरे या बाल कलाकारांना विशेष बक्षीस देण्यात आले.प्रशांत साळुंखे शहरप्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संकल्पनेतून शहर शिवसेनेचे सर्व महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली. रविवारी सकाळी स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जि. प. अध्यक्ष उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला उपजिल्हाप्रमुख संध्या कोसुंबकर, महिला तालुकाप्रमुख साक्षी रावणंग, महिला विधानसभा क्षेत्रप्रमुख सायली पवार, महिला शहरप्रमुख मनिषा बामणे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख शशिकांत बारगुडे, किरण तोडणकर, संदीप सुर्वे उपस्थित होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सचिन लांजेकर आणि राजेश जाधव यांनी केले.या वेळी बंड्या साळवी म्हणाले की, राजकारण २० टक्के व समाजकारण ८० टक्के करायचे हा संदेश बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. शिवसेनेतर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धा प्रथमच आयोजित केली. स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. सध्या महाराष्ट्रात महाभयंकर स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीची स्पर्धा येणार आहे, ती आपल्याला जिंकायची आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक जिंकून त्याची सुरवात केली आहे. काल मातोश्रीवर जल्लोष होता. पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. कार्यकर्ते जबाबदारी आहे. संघटना कशी मोठी होईल. मताधिक्य कसे देता येईल, अशी सूचना त्यांनी केली.राजेंद्र महाडिक व उदय बने यांनीही आपल्या मनोगतामध्ये विधानसभा निवडणूक जिंकायची आहे, याचे सुतोवाच केले. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना दिल्या. स्पर्धेचे नियोजन चांगले केल्याबद्दल शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.उपशहरप्रमुख नितीन तळेकर, बावा चव्हाण, विभागप्रमुख सलील डाफळे, राजन शेटे, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, संदेश भिसे, नंदकुमार बने, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर, उपशहरपमुख महिला उन्नती कोळेकर, विभागप्रमुख (महिला) पूजा जाधव, सेजल बोराटे, उपशहरप्रमुख विजया घुडे, स्मिता काटकर, सुवर्णा कडू, अमृता पाटील, राजश्री लोटणकर, सुहासिनी पूनसकर, बंड्या सुर्वे, सिद्धराज सावंत, जकी खान, संजय गायकवाड, पिंटया भागवत, संजय पावसकर, राजू नेरकर, शशी आलीम, बिपीन शिवलकर, प्रविण शिवलकर, राजू सुर्वे, पप्पू माजलकर, श्वेता फाळके, दिपाली जाधव, गीता शिंदे, हिना दळवी, दीपक सुवरे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.