
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना विभागप्रमुख डॉ. झिमण यांचा राजीनामा.
रत्नागिरीतील गेली २० वर्षे उद्धव ठाकरे शिवसेनेत काम करणारे रत्नागिरीचे विभागप्रमुख ऍड. प्रतिक झिमण यांनी आपल्या पदाचा राजीनामा तालुकाध्यक्ष बंड्या साळवी यांच्याकडे दिला. त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी गेली २० वर्षे शिवसेना या पक्षात काम करत आहे. परंतु माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे राजकीय क्षेत्रात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तरी मी ठाकरे सेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. www.konkantoday.com