
लायन्स क्लब रत्नागिरी चा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न
29 सप्टेंबर रोजी अंबर हॉल येथे लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.5 सप्टेंबर शिक्षक दिन त्या अनुषंगाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. शिक्षण समिती अध्यक्ष Mjf ला शिल्पा पानवलकर आणि समिती सदस्यांनी शिक्षकांची निवड केली . ला शिल्पा यांनी आपले मनोगत ही व्यक्त केले. या पुरस्कारासाठी प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन तसेच विशेष पुरस्कारांनी शिक्षकांना गौरविण्यात आले. हे पुरस्कार कै . ल.ग.पटवर्धन स्मृती प्रित्यर्थ एफ जे एफ लायन हेरंब पटवर्धन सर पुरस्कृत करतात. महाविद्यालयीन विभागात गोगटे कॉलेजच्या उप प्राचार्य डॉक्टर सौ अपर्णा मिलिंद कुलकर्णी ,माध्यमिक विभागात सौ अंजली संतोष पिलणकर ,मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल ,प्राथमिक विभागात सौ प्राजक्ता प्रकाश कदम , कृ.चि.आगाशे प्राथमिक विद्यामंदिर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विशेष पुरस्कारा अंतर्गत 1.पै हुसेनखान आदामखन फडनाईक स्मृती प्रित्यर्थ Mjf ॲड ला शबाना वास्ता यांनी मोहम्मद झुबैर आदम गडकरी 2.सौ राजश्री दत्तात्रय गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ Mjf ला शिल्पा पानवलकर यांनी सौ मंजिरी करंदीकर 3.श्री अविनाश मोरे स्मृतिप्रीत्यर्थ ला साक्षी धुरी यांनी श्रीयुत भूषण बेलवलकर 4.सौ अलका देव स्मृतिप्रित्यर्थ Mjf ला डॉ शिवानी पानवलकर यांनी सौ सोनाली पाटणकर यांना पुरस्काराने सन्मानित केले .या कार्यक्रमासाठी श्री. डॉ. सदानंद गोपाळ आग्रे सर हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते .लायन्सचे मुखपत्र असलेल्या *रत्नकेसरी *2024 -25या वर्षातील पहिल्या अंकाचे प्रकाशनही करण्यात आले .संपादक Mjf ला डॉ संतोष बेडेकर यानी अंकात महिला सबलीकरण या विषयावर लायन सदस्यांनी लेख लिहिले आहेत .असे सांगितले. गायडींग माजी प्रांतपाल उदय जी लोध यांनी शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम अंबर हॉल येथे लायन सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .आदर्श शिक्षक पुरस्काराबरोबरच लायन्स क्लब मधील शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले.इंजिनिअर्स डे आणि लायन्स मधील गुणवान पाल्यांच्या गुणगौरव ही करण्यात आला सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच लायन्स क्लब करत असलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा ही दिल्या.क्लब चा 52 व वर्धापन दिन आणि संस्थापक सदस्य Mjf ला डॉ रमेश जी चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला




