पर्यटन कार्यक्रमात महिलांनी शौचालयांची मागणी रेटवून धरल्याने नाराज नगरपरिषदेचे अधिकारी कार्यक्रमातून बाहेर.
जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात शौचालयाचा मुद्दा वादाचा ठरला. कार्यक्रम पर्यटनाचा असला तरी स्वच्छ सुंदर चिपळूणचा धागा पकडत महिलांनी शौचालये उभारण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर या मागणीचे त्यांनी दिलेले निवेदन काव्यात्मक पद्धतीने वाचण्यात आले. यामुळे भर कार्यक्रमात नगर परिषद अधिकार्यांनी नाराजी व्यक्त करीत कार्यक्रम सोडून जाणे पसंत केले. यामुळे गोंधळ उडाला. अखेर शुक्रवारी आयोजकांनी नगर परिषदेत जावून मुख्याधिकार्यांची माफी मागितली.ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटी, कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था, सह्याद्री निसर्ग मित्र, ऍक्टिव्ह ग्रुप आयोजित नर परिषद प्रायोजित स्वच्छ चिपळूण, सुंदर चिपळूण आणि आकर्षक चिपळूण पर्यटन या उपक्रमाचा गुरूवारी येथे शुभारंभ झाला. आमदार शेखर निकम यांनी येथे मार्गदर्शन केले. त्यांचे भाषण झाल्यावर ते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यानंतर पुढे काही वेळ कार्यक्रम चालल्यावर अचानक काही महिला आक्रमक झाला. तुम्ही स्वच्छ चिपळूण, सुंदर चिपळूण आणि आकर्षक चिपळूण पर्यटनाच्या गोष्टी सांगता. पण महिलांसाठी शहरात पुरेशी शौचालये नाहीत, जी आहेत त्याची साफसफाई होत नाही. असा प्रश्न उपस्थित करीत तसे निवेदन कार्यक्रमातच मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिले.त्यानंतर हे निवेदन उपस्थित नागरिकांसमोर काव्यमय पद्धतीने वाचण्यात आले. यामुळे मुख्याधिकारी भोसले यांसह प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर आदींनी आयोजकांकडे नाराजी व्यक्त केली.www.konkantoday.com h