
गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरील मिरजोळी-उक्ताड मार्गावरचा प्रवास ठरतोय जीवघेणा
गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरील मिरजोळी ते उक्ताड भागात पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे येथील प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. ऐन गणेशोत्सवातही येथील धक्कादायक परिस्थिती जैसे थे असल्याने संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून तातडीने या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी केली आहे. मिरजोळी ते उक्ताड बायपास रस्त्याच्या दयनीय अवस्थेकडे श्री. दलवाई यांनी लक्ष वेधले आहे.
www.konkantoday.com



