
दिल्लीने आता करोना नियंत्रणात कसा आणायचा ते महाराष्ट्राकडून शिकावे -काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक
आज महाराष्ट्र व मुंबईने करोना नियंत्रणात आणण्याचे नियोजनबद्ध काम चालवले असताना दिल्ली करोनाने पेटली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच डझनभर सनदी अधिकाऱ्यांसह २८ हजाराहून अधिक लोक करोना बाधित का झाले याचे उत्तर कोण देणार? असा सवाल राज्यातील एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर केला तर करोना सनदी अधिकारी, श्रीमंत वा गरीब असा भेदभाव करत नसतो असे सांगून दिल्लीने आता करोना नियंत्रणात कसा आणायचा ते महाराष्ट्राकडून शिकावे, असा जेरदार टोला आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
www.konkantoday.com