सावधान..! रत्नागिरी जिल्हा धिकाऱ्यांच्या नावाने बोगस फेसबुक खाते,’ते’ फेसबुक खाते जिल्हाधिकाऱ्यांचे नाही,प्रशासनाचे स्पष्टीकरण


*रत्नागिरी – Devendra Singh IAS Ratnagiri Collectorate या नावाने एक बोगस फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे. ते रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे नाही. यावरुन आलेली मैत्रिची विनंती कोणीही स्वीकारु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
या बोगस खात्यावर एका महिलेच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला असून, यावर अजिबात विश्वास ठेवू नये. या खात्यावरील कोणत्याही बातमीवर किंवा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये.
*Collector & District Magistrate-Ratnagiri* याच अधिकृत खात्यावरुन शासकीय उपक्रमांची माहिती दिली जाते. अन्य कोणत्याही प्रकारचे संदेश पाठवले जात नाहीत. कृपया, याची फेसबुक वापरकर्त्यांनी, दर्शकांनी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button