राजापूर, रत्नागिरी, चिपळूण विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा.
राजापूर, रत्नागिरी, चिपळूण विधानसभा मतदारसंघावर जिल्हा कॉंग्रेसने दावा केला असून या मतदारसंघासाठी इच्छुकांच्य मुलाखती प्रभारींनी घेतल्या आहेत. याचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार असून त्यानंतर युती म्हणून पक्षाची योग्य भूमिका ठरेल. मात्र रत्नागिरीत कॉंग्रेसचा हात पाहिजे अशी ठाम भूमिका वरिष्ठांकडे मांडली असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सांगितले.कॉंग्रेस भवन येथे कोकण प्रभारी बी. संदिप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सेल आणि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक झाली. आगामी विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने कोकणचे प्रभारी कॉंग्रेसची रणनिती ठरविण्यासाठी इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी रत्नागिरीत आले होते. www.konkantoday.com