रत्नागिरी शहरातील वृद्धेला लुटणारे दांपत्य पोलिसांच्या ताब्यात.

रत्नागिरी शहरात भर वस्तीतील वृद्धेच्या घरात शिरून तिला मारहाण करुन तिच्या दागिन्यांची चोरी करुन फरारी झालेल्या जोडप्याला आरोपीना २४ तासांच्या पकडून अटक आहे.रत्नागिरी शहरामध्ये भरदिवसा वृध्द महीलेला मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 24 तासांचे आतमध्ये अटक केले चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहेदिनांक 28/09/2024 रोजी सकाळी 08.45 वा. चे सुमारास हरी ओम मंगल कार्यालय (लता टॉकीज) जवळ असलेल्या घरामधील एकटयाच असलेल्या एका वयोवृध्द महिलेला मारहाण व दुखापत करुन तिचे हातामधील दोन सोन्याच्या बांगडया व गळयामधील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून जबरी चोरी केलेली होती सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ नियुक्त करुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन सदरचा गुन्हा हा शेखर रमेश तळवडेकर याने त्याची पत्नी आश्लेषा शेखर तळवडेकर हीचे मदतीने केलेला असल्याचे निष्पन्न करुन गोपनीय माहीतीचे आधारे आरोपी (1) शेखर रमेश तळवडेकर, वय 47 वर्षे, (2) सौ. आश्लेषा शेखर तळवडेकर वय 48 वर्षे दोन्ही रा. ओम शांती प्लाझा, लक्ष्मी चौक, गाडीतळ रत्नागिरी मूळ रा. तळवडे ता. सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग यांना 24 तासांचे आतमध्ये ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयात जबरी चोरी केलेले एकूण 1,64,000/- रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने (100% मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button