
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते, आता बनावट खाते बनवणाऱ्याने महिलेच्या फोटो काढून जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो टाकला.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडण्यात आले असून हे फेसबुक खाते बनावट आहे त्यामुळे या खात्याला कोणीही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते सुरुवातीला या बनावट फेसबुक अकाउंट वर महिलेचा फोटो होता आता तो काढून सदर बनावट खाते उघडणार्याने जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो टाकला आहे त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे तरी सदरचे खाते बनावट असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे