बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्याला अटक.
_रत्नागिरी शहरातील बांधकाम कामगारांची फसवणूक केल्याबद्दल एकाला अटक करण्यात आली आहेबांधकाम कामगारांकडून शासनाचे योजनांचा एक भाग असलेले कार्यालय आहे असे भासवून शासन फि एक रुपया असताना हजार ते दीड हजार बांधकाम कामगारांकडून उकळणाऱ्या इस्लामपूर येथील ठगाला शहर पोलिसांनी अटक केली.नरेंद्र करंजुसकर (रा. इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ऑगस्ट २०२४ ते २४ सप्टेंबर २४ या कालावधित शिवरुद्र प्राईड, दुसरा मजला, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित करंजुसकर याने शिवरुद्र प्राईड, दुसरा मजला, शिवाजीनगर येथे स्वतःचे खासगी कार्यालय सुरु करुन महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांसाठीचे हे कार्यालय असल्याचे भासवले. तसेच शासनाची कामगार बांधवांसाठी कार्यालयीन फि ही एक रुपया असताना देखील विविध योजनांतर्गत येणाऱ्या कामगारांकडून हजार ते दीड हजार रुपये शुल्क आकारून कामगारांची फसवणूक केली. या प्रकरणी संदेश सुभाष आयरे (वय ४२, रा. ऋतुरंग अपार्टमेट, जोशीमठ जवळ, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २७) ला संशयित अटक केली आहे