माणगांव खून प्रकरणातील संशयिताचे पलायन, रत्नागिरी रेल्वे स्टेशनमध्ये उतरल्याचे सीसीटीव्हीत आढळले.
Bbbदोन आठवड्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील माणगाव रेल्वे स्थानकानजिक घडलेल्या एका तरूणाच्या खूनप्रकरणातील दोन संशयित तरूणांनी मंगळवारी सायंकाळी रत्नागिरी रेल्वेस्थानकात उतरून जंगलाच्या दिशेने पलायन केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली.यासंदर्भात त्या दोघांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. त्यावरून रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसर आणि अन्यत्र त्या दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे.तीन तरूणांमध्ये वाद होवून एकाचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने रायगड हादरले होते. बुधवार ११ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास माणगांव येथे स्थानकानजिक दुकानाच्या शेडमध्ये तीन तरूणांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर मारामारीची घटना घडली होती. या मारहाणीत एक तरूण गंभीर जखमी झाला होता. परंतु त्याला उपचार देण्याऐवजी तशाच अवस्थेत सोडून संशयित पसार झाले होते. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी तरूणाचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले चाकूसारखे हत्यार, रक्त पुसून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात माणगांवमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथे दाखल गुन्ह्याकामी पसार झालेल्या दोन्ही आरोपींची विविध ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणांनाही खबर देण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरही त्या पसार दोन्ही संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना तपास यंत्रणेने दिलेल्या आहेत.त्यावरून रत्नागिरी रेल्वेस्थानकावर देखील यंत्रणेकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. दरम्यान रेल्वेस्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीमध्ये मंगळवारी माणगांव खून प्रकरणातील हे दोघे संशयित स्थानकावर उतरल्याचे कैद झाले. www.konkantoday.com