महा. राज्य जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना रत्नागिरी यांच्या भेटी नंतर जिल्ह्यातील 37 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती कर्मचाऱ्यांनमध्ये समाधान* जिल्हाध्यक्ष परशूराम निवेंडकर यांनी अधिकारी यांचे मानले आभार
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा रत्नागिरी चे वतीने दोन दिवसा पूर्वी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये साहेब यांची भेट घेतली होती या भेटीत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांची रखडलेली पदोनत्ती बाबत चर्चा करण्यात आली होती. जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी यांची रिक्त पदे आणि होणारी पदोन्नती याचा समतोल राखला जाऊन दोन दिवसात पदोन्नती च्या ऑर्डर केल्या जाईल असे आश्वासन संघटनेला दिले होते त्या प्रमाणे आरोग्य सेवक मधून आरोग्य सहाय्यक पदी 11 कर्मचाऱ्यांचे तर आरोग्य सेविका मधून आरोग्य सहाय्यिका पदी 26 कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे तसे आदेश काल निर्गमित करण्यात आले. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये साहेब यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्या मुळे जिल्हा अध्यक्ष डॉ.परशुराम निवेंडकर यांनी आरोग्य अधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचे आभार व्यक्त केले आहेत.