धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने जावयाचा गळा दाबून खून.

धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने जावयाचा गळा दाबून खून केल्या प्रकार कोल्हापुरात घडलाय. मुलीला आणि नातवाला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं आहे.गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडलाय. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप शिरगावे असं खून करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. दरम्यान, जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने मिळून संपवलं आहे. गडहिंग्लजवरून कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत गळा आवळून खून करण्यात आलाय. दरम्यान सासू-सासऱ्याने जावयाचा मृतदेह बस स्टँडवर नेऊन ठेवला होता. संदीप शिरगावे या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर आढळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button