चिपळुणातील मुस्लीम समाज संस्थेच्या बहुउद्देशीय प्रकल्पाला पूर्ण ताकद देऊ, शरद पवार यांचे आश्‍वासन.

चिपळूण येथील मुस्लीम समाज संस्थेने सामाजिक दृष्टीकोनातून हा जो बहुउद्देशीय प्रकल्प हाती घेतला आहे तो समाजासाठी आदर्शवत असाच आहे. येत्या दोन महिन्यात राज्यात आमची सत्ता येणार आहे. सत्ता येताच या प्रकल्पाला पूर्ण ताकद लावू अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी दिली. प्रकल्पाला दिलेल्या भेटी दरम्यान त्यांनी हा शब्द पदाधिकार्‍यांना दिला.खासदार शरद पवार रविवार व सोमवार या दोन दिवसीय दौर्‍यावर चिपळूणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आवर्जुन येथील मुस्लिम समाज संस्था उभारत असलेल्या बहुउद्देशीय प्रकल्पाला भेट दिली. या वेळी माजी आमदार रमेशभाई कदम, सरचिटणीस प्रशांत यादव, माजी मंत्री बाळाराम पाटील, बबन कनावजे आदी नेते त्यांच्याबरोबर होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button