
खेडमध्ये रामदास कदम यांना बसणार धक्का, माजी पदाधिकारी उबाठामध्ये जाणार.
खेड कोकणात शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा जिल्हा परिषदेत सर्वोच्च मानाचे पद भूषविलेला व जिल्ह्याच्या राजकारणात मोठं नाव असलेला एक माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांना हा सगळ्यात मोठा धक्का मानला जाईल. www.konkantoday.com