ऍट्रॉसिटीसह सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राधा लवेकरला अखेर चिपळुणात अटक.
ऍट्रॉसिटीसह सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राधा लवेकर हिला अखेर सोमवारी चिपळूण पोलिसांनी अटक केली. यावेळी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर कामथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे एका महिलेने राधा लवेकर हिच्याकडून कर्ज स्वरूपात २० हजार रुपये घेतले होते. हे कर्ज फेडल्यानंतर त्यासाठी दिलेल्या कागदपत्रांची त्या महिलेने मागणी केली असता लवेकर हिने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी लवेकर हिच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात सावकारी ऍट्रॉसिटीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच लवेकर हिने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असता तिचा जामीन अर्ज फेटाळून लावत पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात आदेश दिले होते.www.konkantoday.com