शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना अब्रूनुकसानीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात आता त्यांना दिलासा मिळाला असून जामीनही मंजूर झाला आहे.१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय वरच्या कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी 30 दिवसांचा कालावधीची मुभा देण्यात आलेली आहे. माझगाव कोर्टाने हा निर्णय दिला.