
रत्नागिरी शहरातील विस्तारित नळपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात ,रत्नागिरी नगर परिषद नागरिकांना मोफत मीटर देणार -मंत्री उदय सामंत
रत्नागिरी शहरातील विस्तारित नळपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील ७० टक्के भागात पाणी पुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल. तर सुमारे सव्वा दोन कोटी रु. खर्च करुन पंधरा हजार कनेक्शनधारकांना मोफत मीटर देण्यात येणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
राजकीय विरोधामुळे योजनेचे काम सुरूवातीलाच ठप्प झाले होते. त्यानंतर योजनेच्या कामाला गती आली. मात्र गेले दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे योजनेचे काम पुन्हा ठप्प झाले होते. मात्र गेल्या सहा महिन्यात कामाला पुन्हा गती मिळाली. सध्या योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून जवळजवळ सर्वच भागात पाणी पुरवठा सुरू झाला आहे. काही छोट्या छोट्या भागातील पाणी पुरवठा सुरू झाला आहे. काही छोट्या छोट्या भागातील पाणी पुरवठा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. www.konkantoday.com