रत्नागिरी शहरातील पावसामुळे थांबलेले मारुती मंदिर ते माळ नाका कॉंक्रिटीकरणाचे काम अचानक सुरू.
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर नाचणे रोड मझगाव रोड आदींचे कॉंक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर पावसामुळे रत्नागिरी शहरातील काँक्रिटीकरणाचे काम थांबले होते आता अचानक पाऊस सुरू असताना हे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे मारुती मंदिर ते माळनाका असे एका बाजूच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आले आहे मात्र ते करत असताना नगरपरिषदेने नागरिकांना कोणत्याही पूर्वसूचना न देता हे काम सुरू केले आहे त्यामुळे थ सकाळी मारुती मंदिर ते माळनाका या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली एका बाजूने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्यामुळे बऱ्याच वेळेला वाहतूक ठप्प होत आहे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्याआधी रत्नागिरी नगर परिषदेने नागरिकांना सूचना देणे आवश्यक होते याशिवाय पर्यायी मार्गानेही वाहतूक सुरू करता आली असती मात्र ते न केल्याने नागरिकांनी आपापल्या परीने पर्यायी वाहतुकीचा पर्याय निवडला आहे एकीकडे वाहतूक कोंडी असताना मारुती मंदिर येथील आंब्याच्या झाडाखाली पार्किंग सुरू ठेवल्याने तेथेही अनेक वाहने पार्किंग करून ठेवण्यात येत असल्याने अडचण निर्माण होत आहे त्यामुळे या ठिकाणचे रस्ते मोकळे करणे आवश्यक आहेत एकूणच पुढील काही महिने तरी रत्नागिरी कर नागरिकांना कळ सोसावी लागणार आहे