
माणुसकी संपली, पत्नीने दुसरे लग्न केले म्हणून रागाने पहिल्या पतीने भर दिवसा अंगावर पेट्रोल ओतून महिलेला जाळले, सिंधुदुर्ग मालवण मधील घटना.
मालवण शहरात बसस्थानकासमोरील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काम करणाऱ्या विवाहितेचा आज भरदिवसा पेट्रोल ओतून पेटवून देऊन खून करण्यात आला.हा प्रकार गजबजलेल्या परिसरात काल दुपारी पावणेतीनच्या दरम्यान घडला. या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या प्रीती अभय केळुसकर (वय ३४) यांचा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात रात्री दहाच्या दरम्यान मृत्यू झाला. या प्रकाराने येथे एकच खळबळ उडाली.संबंधित महिलेने दुसरा विवाह केला होता. त्या रागातून पहिल्या पतीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संबंधित महिलेस ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला मालवण येथील बसस्थानकसमोरील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळुसकर यांचे धुरीवाडा येथील सुशांत गोवेकर याच्याशी लग्न झाले होते. मात्र, त्रासाला कंटाळून त्यांनी काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या तरुणाशी लग्न केले होते. दुसरे लग्न केल्याच्या रागातून पहिल्या पतीने हे कृत्य केले. दुपारी तो प्रीती ज्या सेंटरमध्ये काम करतात, तेथे प्लास्टिक बॉटलमधून पेट्रोल भरून घेऊन आला. त्याने प्रीती यांच्या अंगावर थेट पेट्रोल ओतले. काही कळायच्या आत लायटर पेटविला. यामुळे भडका उडाला. यानंतर सुशांत तेथून पळून गेला. आग लागलेल्या अवस्थेत प्रीती सेंटरमधून बाहेर आल्या. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी आग नियंत्रणात आणत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रीती गंभीर भाजल्यामुळे त्यांना तेथून ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. पोलिसांनीही ग्रामीण रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. केळुसकर गंभीर भाजल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नव्हती. प्रीती यांचे पहिल्या लग्नानंतरचे नाव सौभाग्यश्वरी सुशांत गोवेकर असे आहे. त्यांचा पती सुशांत यानेच हा प्रकार केला