महायुतीचा आमदार निवडूण आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहन. शासनाच्या योजना घरा-घरात पोचवा:- किरण सामंत.
संगमेश्वर-लांजा-राजापूर मतदार संघात निवणुकीचे बिगुल वाजू लागले असून महायुतीचा आमदार या मतदार संघातून निवडून आणयच्या दृष्टीने शिवसेना नेते किरण सामंत यांनी कामाला सुरवात केले असून किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना राजापूर तालुका कार्यकरणीची बैठक पार पडली. या कार्यक्रमाला येथील पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आण्यासाठी सज्ज होण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कंबर कसली आहे.संगमेश्वर-लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघात पदाधिकारी यांनी कामाला लागण्याचे आदेश किरण सामंत यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.संगमेश्वर-लांजा-राजापूर मतदार संघातील शहर आणि गावाचा आधुनिक विकास करण्यासाठी आपल्याला महायुतीचा आणि आपल्या विचाराचा आमदार निवडून आणायचा आहे. त्यामुळे आचार संहिता कधी ही लागू शकते आपण आपली कामे बाजूला ठेवून मतदार राजा पर्यत पोचणे गरजेचे आहे. सरकारच्या विविध योजना सुरु असून त्या ग्रामीण भागात पोचल्या नसल्याचे माझ्या लक्षात येत आहे. त्यामुळे या योजना घरा-घरा पर्यत पोचणू सर्व सामान्य जनतेला लाभ मिळवून द्या. किरण सामंत मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले,तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ७० कोटीची शहराची नळपाणी योजना मंजूर करण्यात यश आले आहे.लोकांपर्यंत पोचुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या प्रश्न सोडवा समाजकारण करा कायम राजकारण करू नका. आपला विरोधक असला तरी तो जर आपल्याकडे आला मदतीला त्याला मदत करण्याची भूमिका ठेवा असे आदर्शवत मार्गदर्शन केले.यावेळी उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागलेसौरभ खडपेहनिफ काझी,संजय ओगलेआत्माराम सुतार,समाधान तावडे,भरत लाड,मनीष लिंगायत,शैलेश साळवी यांच्या सहित शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.