
बळीराज सेनेच्या पाठपुरव्याने तिल्लोरी कुणबी अबाधित-सुरेश भायजे
. राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना झाल्यानंतर सन २००४ ला ओबीसी स्पेशल जातीची जी यादी (गॅझेट) प्रसिद्ध केले. त्यामधून तिल्लोरी कुणबी जातच नष्ट करण्यात आली होती. बळीराज सेना पक्षाचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे व सततच्या पाठपुराव्यामुळे गेले अनेक वर्ष ओबीसीतून हद्दपार झालेल्या तिलोरी कुणबी समाजाचा अखेर ओबीसीमध्ये पोट जात म्हणून समावेश करून न्याय मिळाल्याचे मत बळीराज सेनेचे उपाध्यक्ष सुरेश भायजे यांनी सांगितले. www.konkantoday.com