नव नियुक्त कोकण रेल्वे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट यांची कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.
नव नियुक्त कोकण रेल्वे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट यांची कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी नुकतीच भेट घेऊन नव्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक सुशांत ऊर्फ मुन्ना चवंडे, माजी नगरसेवक राजेश तोडणकर,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य व माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, भाजपा शहर उपाध्यक्ष शेखर लेले उपस्थित होते. या प्रसंगी चर्चा करत असताना प्लॅटफॉर्मवर भटकी गुरे येतात, विशेषतः एक नंबर प्लॅटफॉर्मवरुन मधल्या ब्रीज वरुन ये जा करतात त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सचिन वहाळकर यांनी केली. तसेच अनेक गाड्या विशेषतः नेत्रावती, मत्स्यगंधा,रत्नागिरी दिवा पॅसेंजर व इतर यांना चिपळूण स्थानकावर किंवा त्या पुढे थांबवून ठेवण्यात येत असल्याने त्या रत्नागिरीत येण्यास कायम विलंब होतो. यात तातडीने सुधारणा होण्याची मागणी सर्व शिष्टमंडळाने केली. चिपळूण च्या धर्तीवर एक्झिक्युटिव्ह लाऊंजचे प्रस्तावित काम रत्नागिरी स्थानकावर लवकरच कार्यान्वित करण्याचे आश्वासन रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट यांनी दिले. कोकण रेल्वे मधे आता दोनशे पदांवर जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्यात प्रकल्प ग्रस्तांना प्राधान्याने सामावून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. बापट साहेब यांनीही कोकण रेल्वेचे हेच धोरण असल्याच प्रतिपादन केले .शैलेश बापट यांना प्रवसी प्रतिनीधी म्हणून रत्नागिरीतील पुढील कार्यकाळासाठी सचिन वहाळकर व ईतरांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्यकाळात रत्नागिरीतील अनेक समस्या मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली.