
झोपलेल्या केतकीवर सापाच्या रूपाने काळाचा घाला.
* रत्नागिरी तालुक्यातील चांदोर नळीवाडी येथे सर्पदंश झाल्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. केतकी महादेव बारमोडे (१०, रा. चांदोर-नळीवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगड पोलिसात झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतकी ही २२ सप्टेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करुन झोपी गेली होती. रात्रीच्या सुमारास झोपेत अचानक साप चावल्याने केतकी जोराने ओरडली. केतकीच्या ओरडण्याने नातेवाईक जागे झाले. त्यांना घरामध्ये साप असल्याचे दिसले. यावेळी केतकी हिला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान केतकी हिचा मृत्यू झाला,