चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणग्रस्तांपैकी १४ कुटुंबांना अजूनही कोणी वाली नाही.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाचा प्रश्न गेल्या पाच वर्षापासून अद्याप सुटलेला नाही. २४ कुटुंबांच अर्धवट पुनर्वसन झालं असलं तरी अजून १४ कुटुंब भटकंती करत आहेत. सरकारने येथील बाधित कुटुंबाला आश्वासित करून आधार दिला खरा पण आता तो पायदळी तुडवला आहे. याबद्दल लोकांमध्ये संताप आहे, पण चहोबाजूंनी संकटात असलेले तिवरेकर अजूनही सरकारवर भाबड्या आशेने पाहत आहेत.www.konkantoday.com