
चिपळुणात मोठ्या नेत्यांचे दौरे आटोपल्याने पोलिसांना विश्रांती.
जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार त्या पाठोपाठ जाहीर सभेस संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार चिपळूण दौर्यावर आले होते. या २ दिग्गज नेत्यांच्या पुरेशा सुरक्षेसाठी शहराच्या प्रत्येक ठिकाणी दिवस-रात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखेर सोमवारी सायंकाळी शरद पवार चिपळूणहून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर बंदोबस्ताकामी व्यस्त असलेली संपूर्ण पोलीस यंत्रणा अखेर रिलॅक्स झाली.www.konkantoday.com