गुहागर व दापोली विधानसभा मतदार संघात सर्व राजकीय पक्षांनी ओबीसींना प्रतिनिधीत्व द्यावे- दिपक शिगवण.
गुहागर व दापोली या दोन विधानसभा मतदार संघात ओबीसी व इतर लहान लहान समाजाची ताकद असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या मतदार संघात ओबीसी उमेदवार द्यावे. आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी राहून निवडून आणू आणि जर ओबीसी उमेदवार दिले नाहीत तर आम्ही वेगळा विचार करून स्वतंत्र उमेदवार उभा करण्याबाबत निर्णय घेऊ, असा इशारा खेड तालुका ओबीसी, व्हिजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष दीपक शिवगण यांनी दिला.चिपळूण येथे ओबीसी, व्हिजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने चिपळूण, खेड, गुहागर ओबीसी संघटनेच्यावतीने काल मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.www.konkantoday.com