
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी देवरूख चिपळूण खेड विभागात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला.
कोकणात व रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात दोन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. जिल्ह्यात अनेक भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.हवेत उष्मा वाढला होता. सायंकाळी रत्नागिरी शहरासह अनेक भागात पावसाने सुरुवात केली विजेच्या गडगडाटासह पहाटेपर्यंत पाऊस पडत होता.खेड तालुक्यातील मुरडे येथील श्याम कुळे यांच्या बंद घरावर वीज कोसळून नुकसान झाले
www.konkantoday.com