अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले ,15 दिवसांची कैद.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आला आहे. 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने निकाल दिला आहे. 2022 सालचे हे प्रकरण आहे. मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता.