
वांद्रे-मडगांव स्पेशल गाडीला कोकणातील अनेक स्थानकांना वगळल्याने नाराजी.
पश्चिम रेल्वे महामार्गावरून कोकणातून गोव्याला जाणारी वांद्रे-मडगांव स्पेशल सुरू झाल्याचे पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेल्या कोकणवासियांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. या गाडीसाठी कोकणवासियांसह प्रवासी संघटनेने केलेल्या सततच्या पाठपुराव्याने अनेक वर्षापासूनच्या मागणीला हिरवा कंदिल मिळाला. मात्र स्पेशलला कोकण मार्गावर मोजक्याच रेल्वेस्थानकांवर देण्यात आलेल्या थांब्यामुळे गाडी कोकणची अन सोय गोव्याची अशा नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.कोकणातून थेट पश्चिम उपनगरात जाणारी कायमस्वरूपी गाडी नसल्याने बांद्रा, बोरिवली, विरार, वसई येथील कोकणवासियांची गैरसोय होत होती. पश्चिम उपनगरात वास्तव्यास असणार्या चाकरमान्यांना गावी येण्यासाठी सीएसएमटी मुंबई किंवा दादर रेल्वे स्थानकात यावे लागत होते. यामुळे पश्चिम उपनगरातून कोकणासाठी स्वतंत्र गाडी सोडण्यासाठी कोकण विकास समितीसह कोकणातील प्रवासी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे बोर्डाने बांद्रा ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वे महामार्गावरून वसईमार्गे आठवड्यातून दोनवेळा धावणार्या स्पेशलला हिरवा कंदिल दिला.गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ३ सप्टेंबरपासून वांद्रे-मडगाव स्पेशल पश्चिम उपनगरातून कोकण मार्गावर धावू लागली. आठवड्यातून बुधवार व शुक्रवारी व परतीच्या प्रवासात मंगळवार व गुरूवारी धावणार्या स्पेशलला खेड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, वैभववाडी तालुक्यात एकही थांबा दिलेला नाही. www.konkantoday.com