देवरूख डेपोचे नियोजन कोलमडले

संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख डेपोच्या एसटी फेर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. अनेक फेर्‍या उशिरा सोडल्या जात आहेत. काही मार्गावर तर फेर्‍याच सोडल्या जात
नाहीत. देवरूख-रत्नागिरी मार्गावर दुपारच्या सत्रात उशिरा फेर्‍या सोडल्या जात आहेत. चाकरमान्यांसाठी फेर्‍या सोडताना स्थानिकांकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. देवरूख-रत्नागिरी मार्गावर भारमान चांगले असते. मात्र दुपार सत्रात या मार्गावर वेळेत फेर्‍या न सोडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तासन्तास बसथांब्यावर प्रवाशांना थांबावे लागते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button