राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पिठासमोर ही सुनावणी होईल. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नसल्याने आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलं आहेमागच्या आठवड्यात शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रकरण मेंशन करतेवेळी विधानसभा निवडणुका लक्षात घेता महत्त्वाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या सुनावणीकडे विशेष लक्ष असेल. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम त्यावर होऊ शकतो. या अर्थाने सुप्रीम कोर्टाचे निर्देश महत्त्वाचे असतील.शरद पवार यांच्या पक्षाने कोर्टाकडे केलेल्या मागण्या :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या-अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्याची मागणी करायला सांगा-निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना (अजित पवार) यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावं